Type Here to Get Search Results !

चंदगड तालुका सरपंच संघटनेकडून नूतन सभापती,उपसभापतींचा सत्कार


चंदगड : चंदगड पंचायत समितीचे नवनिर्वाचीत सभापती विलास नाईक व उपसभापती संज्योती मळवीकर यांचा चंदगड तालुका सरपंच (परिषद )संघटनेकडून सत्कार करण्यात आला.यावेळी चंदगड सरपंच परिषदेचे अध्यक्ष आर. जी. पाटील,उपाध्यक्ष सी. ए. पाटील,जिल्हा समन्वयक पी. डी. पाटील,कोदाळीचे सरपंच श्री.झेंडे आदींनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा ग्रामपंचायती समोरील असणाऱ्या अडचणी आपल्या शब्दात मांडल्या.तसेच आपणांस काम करण्याची प्रचंड संधी असून आपण त्या संधीचं सोनं करून आपला कार्यकाल सार्थकी लावावा यासाठी सरपंच परिषद आपल्या पाठीशी खंबीरपणे  सदैव सोबत राहील असेही उपस्थित मान्यवरांनी सांगितले.


यावेळी सभापती विलास नाईक व उपसभापती संज्योती मळविकर यांनी येणाऱ्या काळात टप्प्या-टप्प्याने अडचणी सोडवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली आणि सर्वांचे आभार व्यक्त केले.याप्रसंगी सरपंच संघटनेचे सचीव पवार , खजीनदार राजेंद्र कांबळे,सदस्य सुभाना गावडे,मारुती पाटील,अनंत कांबळे,सदस्या मनीषा देशपांडे व तालुक्यातील सरपंच मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments