मुंबई प्रतिनिधी | संजय धनके : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
हा कार्यक्रम कृष्णकांत भाऊ शिंदे (वरळी विधानसभा) तसेच ग्राहक संरक्षण कक्ष वरळी विधानसभेचे सर्व पदाधिकारी आणि बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता महासंघ लोअर परेल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक २६ जुलै रोजी ना.म.जोशी मार्ग शाळा संकुल डिलाइईल रोड लोअर परळ मुंबई येथे सकाळी ०७.३० वाजल्यापासून सायंकाळी ०४.३० वाजेपर्यंत पार पडणार आहे.या प्रत्येक रक्तदात्यास प्रोत्साहनपर तीन भेटवस्तू देण्यात येणार असून मुंबईतील रक्ताच्या वाढत्या गरजेच्या काळात जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या कडून करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी QR कोड चा वापर करावा.
अधिक माहितीसाठी संपर्क -
1. श्री जीवन भोसले-9819591150
2. श्री संदीप चौरे-9930473048
3. श्री अमर गावडे-7378977969

Post a Comment
0 Comments