नियोजित वेळेपूर्वी सोडली बस फेरी,चालक- वाहक आले गोत्यात !
नेसरी प्रतिनिधी/संजय धनके : प्रवाशांच्या मागणीवरून आजरा आगाराने परेल- आजरा ही बस फेरी मागील काही दिवसापासून चालू केली आहे.सदर बस फेरीची परेल आगारातून सुटण्याची वेळ सायंकाळी 18.00 वाजल्याची असताना देखील दिनांक 26 फेब्रुवारी रोजीच्या चालक व वाहक यांनी संगणमताने दुपारी 16 .00 वाजलेचे दरम्यान आजर्याकडे जाण्यासाठी मार्गस्थ केली.यामुळे प्रवाशांचे नुकसान झाले.
वेळेच्या आधी बस निघाल्याने काही प्रवाशांना नाहक मनस्ताप भोगावा लागला.त्यानंतर दुसऱ्या डेपोच्या गाडीने प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली.या प्रकरणाचा चौकशीचा भाग म्हणून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कमलाकर नामदेव आत्राम, प्रशांत शिवाजी देसाई व पांडुरंग एकनाथ गुरव यांचेवर कोल्हापूर विभाग वाहतूक अधीक्षक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
Post a Comment
0 Comments