चंदगड प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ) : तुर्केवाडी हा भरमु अण्णा पाटील यांचा बालेकिल्ला असून या बालेकिल्ल्यातून मला चांगले मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास कुदनूर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार ज्योतीताई पाटील यांनी व्यक्त केला. त्या तुर्केवाडी येथे आयोजित सभेत बोलत होत्या.
या सभेला आमदार शिवाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गोपाळराव पाटील , भरमु अण्णा पाटील, मानसिंग खोराटे, विष्णू गावडे, जि. ओ. गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व वक्त्यांनी जिल्हा परिषद उमेदवार ज्योतीताई पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
सभेत बोलताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकासकामांचा आढावा मांडला. विकासाच्या जोरावर जिल्हा परिषद उमेदवार ज्योतीताई पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार शिवाजी तुपारे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.सभेत उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत येणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments