नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : हंदेवाडी तालुका आजरा येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला.सुरुवातीला विठ्ठल - रुक्मिणी मूर्तीचे पूजन,वीना पूजन, पताका पूजन, टाळ व पखवाज व गाथा ,प्रतिमा,तुळस पूजन झाले. संपूर्ण धार्मिक विधी हभप बाळासाहेब रानमाळे यांनी केला.सायंकाळी हभप सतुराम लोहार व कोरस यांनी हरिपाठ केला.रात्री हभप शशिकांत गुरव यांचे कीर्तन झाले.
यावेळी कलमेश्वर भजनी मंडळ सांबरे यांनी कीर्तन साथ केली.तर कोलिंद्रे येथील भजनी मंडळाने भजन सादर केले.गुरुवार दिनांक 9 रोजी सकाळी काला कीर्तन नंतर महाप्रसाद होणार असून सायंकाळी श्री ब्रह्मदेव पालखी सोहळा होणार आहे.तर रात्री सुप्रसिध्द सोंगी भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
Post a Comment
0 Comments