रुपेश मऱ्यापगोळ /गडहिंग्लज प्रतिनिधी : प्रस्तावित 'शक्तीपीठ' महामार्ग हा चंदगड विधानसभा क्षेत्रातील तालुक्यातून जावा या मागणीसाठी आज चंदगड विधानसभा मतदारसंघातील नागरिक, भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांच्या वतीने विराट पदयात्रा काडुन प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. संकेश्वर रोड पासून या पदयात्रेला सुरुवात झाली. शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे, आमदार शिवाजी पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणेने शहर दणाणून सोडले. प्रांतधिकारी यांना दिलेल्या निवेदनात या शक्तीपीठ महामार्गामुळे चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील बेरोजगार तरुणांना, हॉटेल व्यावसायिक, व्यापारी, वाहतूकदार व शेतकऱ्यांना एक नवी दिशा मिळणार असून त्यांचा विकास होणार आहे. या महामार्गामुळे मतदारसंघातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांचा विकास होणार असून छत्रपती शिवरायांचा वारसा असलेले कलानंदी गड, गंधर्वगड, सामान गड, पारगड, महिपाळ गड, सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक यांच्या पर्यटनात वाढ होईल. तसेच या महामार्गमुळे कुठेही शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर वेळ प्रसंगी या महामार्गात बदल करावा याची सुध्दा शासनाने खबरदारी घ्यावी व चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हा शक्तीपीठ महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातूनच जावा ही आमची मागणी शासनाने मान्य करावी असे नमूद करण्यात आले आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, कॉंग्रेस नेते किसनराव कुराडे, अशोक आण्णा चराटी,गिरीजादेवी नेसरीकर,हेमंत कोलेकर,दिपकदादा पाटील,संतोष तेली,विजय पाटील, प्रीतम कापसे,अरुण मोकाशी,विशाल बल्लाळ,दिग्वीजय देसाई,नामदेव पाटील,संग्राम अडकुरकर, सचिन बल्लाळ,अनिल शिवनगेकर,सुभाष चौथे, सौ.भारती जाधव, बाळ पोटे-पटिल,बसवराज कंकणवाडी, महादेव साखरे,राजु तारळे,जितेंद्र शिंदे, निलांबरी भुईबर,अविनाश दुध्यागोळ, अमर व्हसकोटी,यांच्यासह शेतकरी बांधव, आजी-माजी सैनिक, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, सरपंच, आजी-माजी जि.प.सदस्य, पं.स. सदस्य, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,युवक- युवती, महिला, बुथ प्रमुख शक्ती प्रमुख सुपरवॉरीअर्स, व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments