Type Here to Get Search Results !

बस व ट्रक अपघातात बसचालक जागीच ठार.

                                

चंदगड प्रतिनिधी : सुपे (ता. चंदगड )येथील आरटीओ चेक पोस्ट जवळ ट्रक व बस यांची समोरासमोर धडक होऊन बस चालकाचा जागीच मृत्यू झाला.लक्ष्मण पांडुरंग हळदणकर (रा. चंदगड ) असे मृत झालेल्या बस चालकाचे नाव आहे.


याबाबत अधिक माहिती अशी बेळगावहून चंदगड कडे जाणाऱ्या ट्रकने बेळगांव ला जाणाऱ्या बसला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती कि बस चालकाकडील संपूर्ण बाजू कापली गेली जाऊन बस चालक जागीच ठार झाले. यामध्ये वाहक सुरेश मर्णहोळकर (रा.घुलेवाडी) यांच्यासह गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना बेळगावच्या के.एल ई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तर इतर सहा प्रवाशांना चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे दोन ते तीन तास वाहनांचे रस्त्यावर लांब रांगा लागून  वाहतुकीची कोंडी झाली होती.अखेर चंदगड पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Post a Comment

0 Comments