Type Here to Get Search Results !

नेसरी येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक स्व.पांडुरंग सखोबा सुतार


गडहिंग्लज/प्रतिनिधी : नेसरी ता.गडहिंग्लज येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक, पांडुरंग सखोबा सुतार वय 98 वर्षे यांचे गुरूवार  दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 06 वाजून 35 मिनिटांनी   वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांचा अल्प परिचय थोडक्यात स्व. पांडुरंग सुतार यांचा स्वभाव साधा, मनमिळावू व प्रेमळ असा होता . त्यांना  शेतीची व फिरण्याची  खूप आवड होती.ते सुतारकाम व लोहारकाम करीत असत.सर्वजण त्यांना बाबा म्हणत असत. परिवाराचे ते आधारस्तंभ होते.सामाजिक व सर्व क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.घरी येणाऱ्या सर्वांचे ते आदराने स्वागत करीत असत. अखेरपर्यंत ते निरोगी राहिले. कुटुंबातील सर्वांना चांगले शिकवून सर्वांना स्वतःच्या पायावर उभे केले.लहानापासून थोरांपर्यंत सर्वांना ते सन्मानाने वागवत असत.त्यांच्या अचानक जाण्याने गावासह ,पंचक्रोशीत शोककळा पसरली.त्यांचे दिवस कार्य रविवार   दि.07 डिसेंबर 2025 रोजी संपन्न होणार आहे.


ऋण निर्देश -

श्री .पांडुरंग सखोबा सुतार वय 98 वर्षे यांचे गुरूवार दि.27 नोव्हेंबर  2025 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.या दुःखद प्रसंगी सर्व ग्रामस्थ,नातेवाईक,मित्र परिवार,शैक्षनिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर , सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य , गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व सदस्य,यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला.या सर्वांचे आमचा सुतार,लोहार परिवार ऋणी आहे.



                     भावपूर्ण आदरांजली


शोकाकुल परिवार -

सुना श्रीमती मीराबाई नारायण सुतार, श्रीमती माधुरी रमेश सुतार.

नातवंडे महेश नारायण सुतार,भागेश नारायण सुतार, युवराज रमेश सुतार,सौ.मनिषा शांताराम सुतार रा. हाजगोळी ता.चंदगड.

मुली श्रीमती सुशाबाई सुरेश सुतार,सौ.शालन हिंदुराव सुतार रा.गोवा.

पणत्र समीक्षा,आर्यन,यश,अंश, काव्या,साईराज, यशोदिप.

समस्त सुतार ,लोहार परिवार नेसरी ता.गडहिंग्लज.

Post a Comment

0 Comments