इब्राहिमपूर (ता. चंदगड) : दत्त जयंती निमित्त उत्क्रांती तरुण मंडळ, इब्राहिमपूर यांच्या वतीने ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता भव्य संगीत सोंगी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी नवक्रांती लोककला मंडळ, लकीकट्टे (ता. चंदगड) यांचे मान्यवर कलाकार विशेष उपस्थित राहून सादरीकरण करणार आहेत.
मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मरगाळे यांनी पंचक्रोशीतील सर्व रसिक भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भजनरंगी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष पुढाकार
या सांस्कृतिक उपक्रमाच्या तयारीत ज्ञानदेव हरेर, मारुती गुरव, जोतिबा मगर, महादेव हरेर यांच्यासह गावातील ग्रामस्थ व जयंती उत्सव समिती यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. कार्यक्रमाची सर्वांगीण तयारी पूर्ण झाली असून भजनप्रेमींसाठी आकर्षक व्यवस्था करण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
दत्त जयंतीच्या निमित्ताने पारंपरिक व भक्तिसंगीताची परंपरा जपणारा हा कार्यक्रम ग्रामस्थांमध्ये उत्साह निर्माण करीत असून, धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिकच रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments