Type Here to Get Search Results !

सुरुते येथे ऊसाला आग, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

 


चंदगड/प्रतिनिधी : सुरुते ता. चंदगड येथील साऊरतळे शेतात अचानक लागलेल्या आगीमध्ये दोन एकर मधील ऊस जळून खाक झाला आहे.यलुप्पा ईराप्पा भाटे, सदानंद भरमानी भाटे,लक्ष्मण कृष्णा भाटे व वैभव कृष्णा कदम या शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला.


ऊस कारखान्याला घालण्यासाठी लगभग होत असल्याने,शेतकऱ्यांनी वर्षभर वाट पाहणाऱ्या पिकालाच आग लागल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते.शेतीतून मिळणारे उत्पन्न बाजूलाच आता शेतकरी झालेल्या नुकसान भरपाईची आस धरून असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.


Post a Comment

0 Comments