नेसरी प्रतिनिधी / पुंडलिक सुतार : कोट (ता.चंदगड) येथे श्री.यल्लमा देवीचा अभिषेक मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. या धार्मिक सोहळ्याला परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली.कार्यक्रमानिमित्त सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी व आध्यात्मिक उर्जेचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवास आला.
अभिषेकाच्या निमित्ताने समाजातील विविध घटक एकत्र आले. गावातील तसेच तालुक्यातील सर्व वयोगटातील भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भाविकांसाठी केलेली महाप्रसादाची व्यवस्था ही सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारी ठरली. सर्वांनी मिळून घेतलेला महाप्रसाद म्हणजे सामाजिक समतेचा व बंधुत्वाचा संदेशच होता.या प्रसंगी पत्रकार पुंडलिक सुतार यांचा सत्कार करून त्यांना मानाचा गौरव देण्यात आला. स्थानिक कमिटीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे उत्सव यशस्वीरीत्या पार पडला.
यल्लमा देवीच्या अभिषेकासारखे धार्मिक सोहळे हे केवळ अध्यात्मिक शांती देणारे नसून समाजातील बंधुत्व, एकोपा आणि सेवा भाव जागवणारे असल्याचे मत अनेक भाविकांनी व्यक्त केले.
Post a Comment
0 Comments