Type Here to Get Search Results !

र. भा. माडखोलकर महाविद्यालयात “ग्रामीण कथाकथन-लोकजीवनाचे जिवंत दर्शन” कार्यक्रम उत्साहात

 


(राजेंद्र शिवणगेकर यांचे कथाकथनातून ग्रामीण संस्कृती, नाती आणि भावविश्वाचे प्रभावी दर्शन,विद्यार्थ्यांना कथाकथनातून संवेदनशीलता,अभिव्यक्ती आणि लोकजीवनाची जाण देण्याचा प्रयत्न)



चंदगड : र. भा. माडखोलकर महाविद्यालयात करिअर कौन्सिलिंग सेल आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने “ग्रामीण कथाकथन – लोकजीवनाचे जिवंत दर्शन” हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात राजेंद्र शिवणगेकर यांनी ग्रामीण जीवनातील संघर्ष, संस्कृती आणि संवेदना यांचे प्रतिबिंब दाखविणारे कथाकथन सादर करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


त्यांनी आपल्या प्रभावी मनोगतात सांगितले की —“कथाकथन हे फक्त गोष्ट सांगणे नसून भावना, संस्कृती आणि लोकजीवनाचा सुगंध पोहोचविण्याचे जिवंत माध्यम आहे. ग्रामीण कथांमधून नाती, श्रम आणि संघर्ष यांचा प्रवास दिसतो; आणि अशा कथांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता व अभिव्यक्तीची ताकद वाढते.”या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गोरल होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी ग्रामीण जीवनाचे वास्तव जाणून घेऊन ते साहित्य, कला आणि समाजकार्याद्वारे सादर करावे, असे प्रतिपादन केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करिअर कौन्सिल सेलचे प्रमुख डॉ. आर. एन. साळुंके यांनी केले. त्यांनी कौन्सिलिंग सेलमार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना योग्य करिअरदृष्टी दिली.आभार प्रदर्शन डॉ. जी. वाय. कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाला प्रा. एस. के. सावंत, डॉ. टी. ए. कांबळे, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. आर. ए. कमलाकर, डॉ. एन. एस. मासाळ, डॉ. राजकुमार तेलगोटे, प्रा. महादेव गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी कथाकथनाच्या माध्यमातून लोकजीवनाची सखोल जाण, निरीक्षणशक्ती आणि सर्जनशील अभिव्यक्तीचे कौशल्य आत्मसात केले.कथाकथनाच्या या सत्राने ग्रामीण संवेदनांचा सुगंध महाविद्यालयीन वातावरणात दरवळविला आणि विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक चेतना जागविली.

Post a Comment

0 Comments