गडहिंग्लज प्रतिनिधी : जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती व भाजपा नेते संग्रामसिंह कुपेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट मध्ये माजी आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला. निवडणुकीच्या पाश्वभूमीवर प्रवेश झाल्याने भाजपाला स्थानिक ठिकाणी मोठा फटका बसणार असे चित्र आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाने आपली ताकद वाढवली आहे.
एकंदरीत,नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातून संग्रामसिंह कुपेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.तसेच स्थानिक ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आली.


Post a Comment
0 Comments