Type Here to Get Search Results !

गडसंवर्धन क्षेत्रातील कार्याची दखल; संतोष हासुरकर जिल्हास्तरीय समितीवर सदस्यपदी नियुक्ती!



चंदगड : कोल्हापूर जिल्ह्यातील गडकिल्ले व राज्य संरक्षित स्मारकांचे जतन, संवर्धन, अतिक्रमण हटविणे तसेच भविष्यात अतिक्रमण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीवर दुर्गवीर प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष संतोष हासुरकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


गडसंवर्धन, ऐतिहासिक वारशाचे संरक्षण आणि जनजागृतीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या त्यांच्या निःस्वार्थ कार्याची ही अधिकृत दखल मानली जात आहे. दुर्गसंवर्धन चळवळीला बळ देणाऱ्या या नियुक्तीमुळे दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संरक्षण, संवर्धन आणि अतिक्रमणमुक्तीच्या कामांना अधिक प्रभावी गती देण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार असून, त्यामध्ये संतोष हासुरकर यांच्या अनुभवाचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, ऐतिहासिक व दुर्गसंवर्धन क्षेत्रातील मान्यवरांनी संतोष हासुरकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा अधिक प्रभावीपणे जतन होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments