राज्यभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात नगराध्यक्ष काणेकर यांच्या सामाजिक जाणिवेतून राबविलेल्या उपक्रमांचा तसेच चंदगड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा विशेष गौरव करण्यात आला. नागरिकांशी सातत्याने संवाद साधत विकासकामांना गती देणारी त्यांची कार्यपद्धती ही इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या सन्मानामुळे चंदगडच्या नावलौकिकात आणखी भर पडली असून, नगराध्यक्ष काणेकर यांच्या कार्याची राज्यस्तरावर झालेली दखल तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी हा सन्मान चंदगडच्या जनतेला समर्पित करत, भविष्यातही अधिक जोमाने सामाजिक व विकासात्मक कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या गौरव सोहळ्याला युवराज पिळणकर, अमेय सबनीस, समीर नाईकवाडी, श्रीशल नागराळ,मयूर गावडे, धोडीबा दळवी,महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुलाबा मुंबई शाखेचे अध्यक्ष भरमु नांगनूरकर,पावणोजी गावडे,दशरथ गुडुळकर,सागर गावडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, नगराध्यक्ष सुनिल काणेकर यांना प्राप्त झालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल चंदगड तालुक्यातील नागरिक, विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
या सोहळ्यामध्ये अशोक नार्वेकर (पाणबुडी देवी कलामंच मुंबई सल्लागार),पाणबुडी देवी कलामंचचे अध्यक्ष संतोष घाणेकर व कोकण भूमीचे सुपुत्र आणि निर्भिड पत्रकार दिपक कारकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment
0 Comments