चंदगड/प्रतिनिधी : तालुक्यातील कोवाड येथे कुंभार समाजाच्या स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.श्री गोरख कुंभार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात माजी आम. राजेश पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या २० लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले.
समाजाच्या मूलभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाला गती देण्याचा संदेश देणारा हा उपक्रम पार पडला. दरवर्षी कुंभार समाज मंडळ कोवाड कडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्या कार्यातून इतर समाजाने प्रेरणा घेऊन गावासाठी स्मशान भूमी व्हावी या करीता प्रयत्न केले. त्यांची ही समाजाप्रती धडपड पाहून महाराष्ट्र शासन नागरी सुविधा योजना सन 2023/24अंतर्गत 20 लाखाचा फंड उपलब्ध करुन दिला. त्या फंडातून कुंभार समाजाने आधुनिक "कुंभार समाज वैकुंठ भूमी" चे बांधकाम केले.
"तालुक्यात सर्व समाजाने कुंभार समाजासारखा एकोपा ठेवून काम केले पाहिजे.कुंभार समाजासाठी जसा फंड उपलब्ध करून दिला त्या प्रमाणे कोवाड गावासाठी, कोवाड गावातील मुस्लिम समाजासाठी सुद्धा फंड वैकुंठ भूमी साठी दिला आहे. माझ्या कार्यकाळात 1600 कोटी ची विकास गंगा चंदगड, आजरा, गडहिग्लज मतदार संघात स्वर्गीय अजित दादा पवार, हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आणली. अशीच विकास गंगा आणण्यासाठी आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन मा. आम. राजेश पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंभार समाजाचे अध्यक्ष सुनिल कुंभार यांनी केले. तर सूत्रसंचालन बसुराज नाईक यांनी केले.आभार अलका ज्ञानेश्वर कुंभार यांनी व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments