नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - शिवशाहू प्रतिष्ठानचे आवाहन
नेसरी प्रतिनिधी/संजय धनके : समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे व अनेकांना नवजीवन मिळावे या उदात्त हेतूने जी साऊथ व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी लोअर परळ येथे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे रक्तदान शिबिर जैनाचार्य हर्षसागरसुरीजी वाचनालय (GVA लायब्ररी), लोअर परळ स्टेशन (पश्चिम) जवळ येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार असून या माध्यमातून ५०० पेक्षा अधिक युनिट रक्त संकलित करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे.
या शिबिराबाबत कोल्हापूर जिल्हा शिवशाहू प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने लोअर परळ, डिलाईल रोड, लालबाग, वरळी तसेच गिरणगाव परिसरातील नागरिकांना व या भागात विविध ग्रामस्थ मंडळांचे सदस्य वास्तव्यास असणार्यांनी सामाजिक बांधिलकी जपत या मानवतावादी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा सन्मान म्हणून पहिल्या ५०० रक्तदात्यांना आकर्षक व उपयुक्त भेटवस्तू देण्यात येणार आहेत. प्रत्येक रक्तदात्यास डबल बेडशीट व दोन पिलो कव्हर, फर्स्ट एड बॉक्स, डिजिटल थर्मामीटर, डिजिटल डायबिटीस चेक मशीन, छत्री तसेच जीवनावश्यक औषधांचा संच भेट म्हणून दिला जाणार आहे. या भेटवस्तू दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या असल्याने रक्तदात्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.
“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या भावनेतून समाजातील प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेत रक्तदान करावे.

Post a Comment
0 Comments