Type Here to Get Search Results !

सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध-मा.आमदार राजेश पाटील


चंदगड : म्हाळेवाडी येथे नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा माजी आमदार राजेश पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सी. ए. पाटील होते, तर प्रास्ताविक शिक्षक संघ नेते शिवाजी पाटील यांनी केले.



यावेळी बोलताना मा.आमदार राजेश पाटील म्हणाले की,“वडिलांकडून मिळालेली विचारांची परंपरा व वारसा जपत जनतेसाठी अखंड सेवा करणे ही म्हाळेवाडीकरांची पिढ्यान् पिढ्यांची परंपरा आहे. मला अभिमान आहे की मी म्हाळेवाडीचा आहे. जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद असून, सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिक्षण, आरोग्य, शेती व पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गावाच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळातही विकासाची ही गती कायम ठेवत म्हाळेवाडीला आदर्श गाव बनविण्याचा आमचा निर्धार आहे.”



या कार्यक्रमात पंचायत समितीचे सभापती विलास नाईक,महिला व बालकल्याण सभापती विद्याताई पाटील,उपसभापती संज्योती मळविकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य पांडुरंग बेनके, मधुकर आंबेवाडकर, सदस्या प्रेमा हुलजी तसेच जिल्हा परिषद सदस्य रचना गावडे,मानसी भोगण यांचा सन्मान करण्यात आला.


सूत्रसंचालन एस एन पाटील यांनी केले.यावेळी भरमाणा गावडा, कलाप्पा भोगण, विलास पाटील, संतोष मळविकर,तानाजी गडकरी,अरुण सुतार,अभयदादा देसाई,बाळू चौगुले,अनिल सुरुतकर,शहापूरकर सर, एस. वाय.पाटील,विश्वनाथ ढेकोळकर,आप्पाजी करडे, विनोद पाटील तसेच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी,पंचक्रोशीतील सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments