चोरांनी तीन गायी चोरल्या,मात्र कालकुंद्री ग्रामस्थांनी लोकमदतीतून नवीन तीन गायी खरेदी करून दिल्या,कालकुंद्री येथे रुजतेय चांगुलपणाची चळवळ
चंदगड/प्रतिनिधी : दोन महिन्यापूर्वी कालकुंद्री (ता. चंदगड) येथे तुकाराम सुबराव पाटील या शेतकऱ्याच्या गावाजवळील शिवारातील गोठ्यातून एकाच रात्री तीन गाईंची चोरी झाली होती. सर्वत्र शोधाशोध करूनही सदर गाई मिळाल्या नाहीत यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. मात्र ही दुर्दैवी वेळ आल्याने ग्रामस्थांनी पुढाकार घेत लोकांच्या मदतीतून बेळगाव येथून तीन गाई खरेदी करून आणल्या आणि सदर शेतकऱ्याला सोमवारी दिनांक 30 रोजी या गाई सुपूर्द केल्या.
तुकाराम पाटील यांचे कालकुंद्री येथे बेळगाव पाणंद मार्गावर असलेल्या गोठ्यातून तीन गाई चोरीला गेल्या. या शेतकरी कुटुंबाला मदत व्हावी या हेतूने एम. जे. पाटील व सुभाष पाटील यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांना आर्थिक मदतीचे आवाहन केले. गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, चंदगड पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल आनंद देसाई (कागणी), एम. जे. पाटील, ए. के. पाटील यांनी प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत करून या उपक्रमाला सुरुवात केली. जे. बी. पाटील ( बसर्गे ), प्रताप पाटील यांनी प्रत्येकी 2500 रु. तर रमेश पाटील, नारायण जोशी, विलास शेटजी सर, प्रा. व्ही. आर. पाटील यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये तर याप्रमाणे एकूण 46 जणांनी आर्थिक मदत केली.यानंतर शेतकरी शंकर जाधव व नारायण पाटील यांनी बेळगाव बाजारातून तीन गाईंची खरेदी केली. सोमवारी (दि. ३०) रात्री नऊ वाजता सदर शेतकऱ्याला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ देणगीदारांचे आभार मानत तीन गायी शेतकरी विशाल पाटील व जिजा पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्या.
.....
मदत देणाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे
.....
माजी सरपंच एम. जे. पाटील (5 हजार),अनंत कृष्णा पाटील गुरुजी (5 हजार), निवृत्त जवान व चंदगड पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल आनंदराव देसाई ( 5 हजार), अंजना केदारी रेडेकर (गोकुळ दूध संघाच्या संचालिका, आजरा 5 हजार ), जे. बी. पाटील ( बसर्गे 2,500), प्रा. व्ही. आर. पाटील सर (2 हजार),रमेश जयराम पाटील (2 हजार), नारायण महादेव जोशी (2 हजार), विलास वसंत शेटजी सर (2 हजार), के. जे. पाटील गुरुजी 1000, अर्जुन पांडुरंग पाटील गुरुजी 1000, विक्रम पेडणेकर 1000, बाळकृष्ण सिताराम पाटील 1000, सुरेश रवळू पाटील 1000, प्रकाश रामू पाटील गुरुजी 1000, सुभाष कृष्णा पाटील 1000, जयवंत लक्ष्मण पाटील गुरुजी 1000, संजय मारुती खवणेवाडकर 1000, पुंडलिक सतबा पाटील 1000, विष्णू मारुती पाटील 1000, शरद रामू जोशी 1000, शिवाजी सखोबा खवणेवाडकर 1000, सुखदेव शिवाजी भातकांडे गुरुजी 1000, जोतिबा यल्लाप्पा पाटील गुरुजी 1000, श्रीकांत लक्ष्मण कदम 1000, छाया राजाराम जोशी 1000, राजाराम सातापा पुजारी 1000, कृष्णा पांडुरंग पाटील गुरुजी 1000, संभाजी रानबा पाटील 1000, दीपक रामदास कालकुंद्रीकर 500, पद्माकर महादेव पाटील 500, विकास वसंत शेटजी 500, उत्तम भावकाना कोळी 500, शशिकांत नारायण सुतार 500, नंदा 500, शंकर कलाप्पा मुर्डेकर 500, सुरेश सट्टूप्पा नाईक 500, दिनकर दत्तू मुंगूरकर 200 प्रताप आनंदराव पाटील 2500, शिवाजी परसू कडोलकर गुरुजी 500, मारुती शंकर पाटील कलागते 500, विलास लक्ष्मण कोकितकर 500, अरविंद लक्ष्मण कोकितकर 500, प्रशांत भावकु मुतकेकर 500, अण्णाप्पा कल्लाप्पा जोशी 200, तानाजी गोपाळ पाटील 500, यासह नारायण पाटील जानकूगावडे व शंकर जाधव यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
यावेळी दैनिक पुढारीचे चंदगड तालुका प्रतिनिधी संदीप तारिहाळकर यांनी मनोगत व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले. या शेतकरी कुटुंबावर सहा महिन्यापूर्वी घर जळाल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते आणि आता तीन गाई चोरी केल्याने त्यांना धक्काच बसला होता.
सोमवारी रात्री तीन गायींचे वितरण प्रसंगी ग्रा. पं. सदस्य विलास शेटजी व प्रशांत मुतकेकर, ए. के. पाटील, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी, प्रा. व्ही. आर. पाटील, विलास कोकितकर, नारायण जोशी, अरविंद कोकीतकर, उत्तम कोळी, शशिकांत सुतार, पुंडलिक पाटील, शंकर जाधव, नारायण पाटील, रमेश पाटील , दिनकर मुंगुरकर, पुंडलिक जोशी, ए. के. पाटील, दीपक कालकुंद्रीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments