Type Here to Get Search Results !

पानिपतकार विश्वास पाटील यांचा साहित्य परिषदतर्फे सन्मान

 


बेळगाव ( प्रतिनिधी ) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव जिल्हा शाखेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक, पानिपतकार विश्वास पाटील यांचा राज्याध्यक्ष रवींद्र पाटील तसेच तानाजी पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


सुवर्ण महोत्सवी वसंत व्याख्यानमाला – २०२६ निमित्त आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक ‘तरुण भारत’चे संपादक किरण ठाकूर होते.आपल्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक भाषणातून त्यांनी साहित्य, इतिहास आणि लेखनप्रवास यावर मार्गदर्शन केले.यावेळी  त्यांच्या भाषणानंतर बेळगावमधील विविध संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित ‘अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन – २०२५’ चे संमेलनाध्यक्ष म्हणूनही विश्वास पाटील यांनी यापूर्वी मानाचा बहुमान भूषविला होता.या प्रसंगी त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.“पानिपत”सारख्या गाजलेल्या कादंबरीतून मराठी साहित्यविश्वात भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या विश्वास पाटील यांच्या साहित्यसेवेचा यावेळी गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास साहित्यप्रेमी व महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती.या कार्यक्रमास साहित्यप्रेमींसह महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती.

Post a Comment

0 Comments