Type Here to Get Search Results !

चंदगड-पारगड-मुंबई एस.टी. बस सेवा पुन्हा सुरु

 


चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड आगाराची अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'चंदगड पारगड मुंबई' ही एसटी बस सेवा गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे बंद होती. या मार्गावरील वाहतूक थांबल्याने प्रवाशांचे, विशेषतः मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत होते. मात्र,लोकप्रतिनिधी आणी ग्रामस्थांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर ही सेवा शुक्रवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली असून,यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


या बस सेवेचा अधिकृत शुभारंभ नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या राजश्री लक्ष्मण गावडे व सामाजिक कार्यकर्ते  लक्ष्मण विश्राम गावडे यांच्याहस्ते बसचे पूजन करून प्रवासाला सुरुवात करण्यात आली. या मंगल प्रसंगी प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.ही बस सेवा पूर्ववत करण्यासाठी अंकुश पवार, महादेव पवार, रघुवीर शेलार, श्रीकांत कांबळे,आप्पाजी गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून,चंदगडच्या पश्चिम भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.


Post a Comment

0 Comments