Type Here to Get Search Results !

जयंतीनिमित्त गडहिंग्लजला आठवडी बाजार सोमवारी भरणार

 


नेसरी प्रतिनिधी/संजय धनके : गडहिंग्लज शहरात रविवारी(दि. १९) भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे.हा बाजार सोमवारी (दि. २०) भरणार आहे.स्थानिक मंडळामार्फत रविवारी छ. शिवाजी महाराज आणि श्री बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे. 


मिरवणूक मार्गात अडथळा होऊ नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, याकरिता हा बदल केला आहे. तरी विक्रेते, व्यावसायिक व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.

Post a Comment

0 Comments