Type Here to Get Search Results !

मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालविणाऱ्या चालकावर चंदगड पोलिसांची कारवाई

 



चंदगड प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ ) : चंदगड शहरातील संभाजी चौक येथे वाहन तपासणीदरम्यान मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालविणाऱ्या चालकाविरुद्ध चंदगड पोलिसांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. ८ जून २०२६) रोजी दुपारी सुमारे १.४२ वाजता संभाजी चौक परिसरात नियमित वाहन तपासणी मोहीम सुरू होती. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका दुचाकीस्वाराला पोलिसांनी थांबवून चौकशी केली. चालकाच्या वर्तनावरून तो मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचा संशय आल्याने त्याची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली.


तपासणीत संबंधित चालकाच्या श्वासामध्ये १८४.९ मिलीग्रॅम प्रति १०० मिली रक्त इतके अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले. हे प्रमाण कायद्याने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.या प्रकरणी भरमा सिद्धू शेलके (वय ५२, रा. मुंडवाड, ता. बेळगाव, जि. बेळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो KA-22-EW-885 क्रमांकाची बजाज प्लॅटिना दुचाकी चालवत होता.


या संदर्भात पोलीस हवालदार रेश्मा ज्ञानदेव क्षीरसागर यांनी फिर्याद दिली असून चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल माने करीत आहेत.मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध अशी कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा देत पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांनी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे व स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments