Type Here to Get Search Results !

हंदेवाडी येथील प्रणालीचा सत्कार


आजरा प्रतिनिधी /पुंडलिक सुतार : हंदेवाडी ता .आजरा येथील प्रणाली मोहन हेब्बाळकर हिने डिझाईन क्षेत्रात परदेशात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल पत्रकार पुंडलिक सुतार यांच्याहस्ते तिचा सत्कार करण्यात आला.


सध्या त्या मुंबई लालबाग येथे वास्तव्यास आहेत. प्रणाली हिने डिझाईन क्षेत्राला विविध स्तरावर उल्लेखनीय यश मिळवून दिल्याने तिचेवर भागातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या प्रणाली यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचा मोठा संघर्ष आणि पाठिंबा आहे. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी, आर्थिक संघर्ष आणि मर्यादा असूनही त्यांच्या आई-वडिलांनी मुलीच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत तिला नेहमी प्रोत्साहन दिले.


सुरुवातीला प्रणाली या आपल्या आजोबांच्या जुन्या शिवण मशीनवर काम करत होत्या. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिचे स्वप्नांना साथ देत आधुनिक पद्धतीची मशीन घेऊन दिली. या नवीन मशीनमुळे त्यांच्या कामाला अधिक वेग मिळाला आणि fashion designing क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.


बारावीनंतर त्यांनी मुंबईतील रचणा संसद येथे Fashion Designing चा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. घरात fashion क्षेत्राशी कोणताही संबंध नसताना स्वतःच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर तिने fashion industry मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. कुटुंबातील fashion designing क्षेत्रात करिअर करणाऱ्या त्या पहिल्याच मुलगी ठरल्या.सत्कारावेळी वडील मोहन हेब्बाळकर, आई सौ.रेखा,आजी सुशीला हेब्बाळकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments