Type Here to Get Search Results !

स्वामिनिष्ठ नरवीर शिवाजी काशीद पुण्यतिथीनिमित्त चंदगड तालुक्यात सोमवारी सलून बंद



चंदगड : स्वामिनिष्ठ नरवीर शिवाजी काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार, दि. १३ जुलै रोजी चंदगड तालुक्यातील सर्व सलून व केशकर्तनालये स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या चंदगड तालुका पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.


स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या नरवीर शिवाजी काशीद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा निर्णय घेण्यात आला असून, पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूर येथील स्मारकावर होणाऱ्या अभिवादन सोहळ्यात तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.


या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोमवार, दि. १३ जुलै रोजी सलून बंद राहणार असल्याची नोंद घेऊन सहकार्य करावे, तसेच शिवाजी काशीद यांच्या त्याग आणि स्वामिनिष्ठेला अभिवादन करण्यासाठी समाजबांधवांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे चंदगड तालुकाध्यक्ष विठ्ठल बामणे, दुकान मालक संघटनेचे अध्यक्ष प्रसाद वाडकर, उपाध्यक्ष स्वराज गडकरी आणि चंदगड शहराध्यक्ष सुजित वाडकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments