Type Here to Get Search Results !

अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरणातील आरोपीना कठोर शिक्षा द्या

 


(फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून काटकर कुटुंबियांना न्याय द्या)


आजरा | प्रतिनिधी : आजरा येथील लाटगावच्या अस्मिता काटकर हिने 12 जुलै रोजी आत्महत्या केली.ही घटना अतिशय गंभीर असून अस्मिताच्या माहेरच्या लोकांचा आरोप आहे की,सासरच्या छळाला कंटाळून अस्मिताने हे टोकाचे पाऊल उचलले आहे आणि तिच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली.त्यामुळे लाटगाव आणि आजरा तालुकावासियांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन आरोपीना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे.


या निवेदनात म्हटले आहे की,हुंड्यासाठी अस्मिताला लग्नानंतर वर्षभर शारीरिक व मानसिक त्रास दिला.सततची मारहाण व अपमानास्पद वागणुकीमुळे तिने आपल्या माहेरच्यांना वारंवार तक्रार केली तसेच तिच्या जीवाला धोका असल्याबाबत तिने माहेरी सांगितले होते.संबंधित खटला हा महाराष्ट्रात चर्चीत स्वरूपाचा असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि न्यायव्यवस्थेवरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास टिकून राहण्यासाठी फास्टट्रॅक पद्धतीने चालवून लवकरात लवकर संबंधित आरोपीना शिक्षा मिळवून द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री कोल्हापूर, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, महिला व बालकल्याण मंत्री, महिला आयोग विभागांना देण्यात आल्या आहेत.यावेळी सुधीरभाऊ देसाई, रणजितकुमार सरदेसाई, वामन सुतार, संदेश दळवी, सुधीर सुपल, भिकाजी दारुटे, विलास पाटील, राजाराम पोतनीस, विजय थोरवत, दत्तात्रय येसणे, संतोष चौगले, गौरव देशपांडे, शरीफ खेडेकर, अमानुला आगलावे,सुशील लतीफ,डॉ. धनाजी राणे,रचना होलम,यशोदा पोवार, डॉ.स्मिता कुंभार, मनीषा देसाई,भारती डेळेकर, जोत्स्ना चराटी, वर्षा यमगेकर, बाळू यादव, रवींद्र तळेवाडीकर, अनिरुद्ध केसरकर, आदिसह लाटगाव व आजरा तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments