Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत मानले आभार!


चंदगड : हेरे सरंजाम प्रश्नांची पायाभरणी सन 2001 मध्ये विधानसभेत प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी स्व.आमदार नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांनी मागणी केली होती.त्यांनतर काही दशके काही शासकीय अटीमुळे हा विषय सारखाच प्रलंबित राहिला.त्यांनतर माजी मंत्री भरमू अण्णा पाटील यांनी प्रयन्त केले. तसेच माजी आमदार राजेश पाटील व नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी सातत्याने विधानसभेत शासनाकडे प्रश्न मांडत प्रयत्न केले. अंतिमता प्रांत व जिल्हाधिकारी यांचे अहवाल, शेतकऱ्यांच्या मागण्या, काही ठराविक पुरावे यांच्या आधारे शासनाने अंतिमता मार्ग काढत कित्येक शेतकऱ्यांच्या हक्काचा विषय मार्गी लावला.


या दोन दशकाच्या काळामध्ये कित्येकदा आंदोलन, मोर्चा, उपोषण झाले.शेवटच्या टप्प्यात आझाद मैदान मुंबई येथेही आमरण उपोषणास रवी नाईक माजी सैनिक रणजित गावडे, अनिल रेगडे यांनी आंदोलन तीव्र केले.एकंदरीत या सर्वांच्या मेहनतीचे सार्थक होत हा विषय कायमचा मार्गी लागला.कृषी दिनाच्या मुहूर्तावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासन निर्णय जाहीर करत शेतकऱ्यांना न्याय दिला.


यावेळी विष्णू कंग्राळकर,सरपंच प्रकाश वाईगडे, सागर भादवणकर सरपंच गणुचीवाडी, दौलत मंडलिक, ओमाना नाकाडी, अनिल नांगनूरकर व आमरोळी, गणुचीवाडी येथील ग्रामस्थ त्याचबरोबर 55 गावातील शेतकऱ्यांनी मुंबई येथील चित्रकुटी या निवासस्थानी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत आभार व्यक्त केले.


सध्या,तालुक्यात श्रेयवाद घेण्यापेक्षा सर्व नेत्यांनी तालुक्यात शेकडो प्रश्न प्रलंबीत असल्यामुळे त्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन तालुक्यातील सक्रिय सामाजिक संघटनेकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments