Type Here to Get Search Results !

सहायक महसूल अधिकारी संभाजी गाडीवड्ड यांचा सन्मान



आजरा प्रतिनिधी | पुंडलिक सुतार : कौलगे ता. गडहिंग्लज येथील सुपुत्र व आजरा तहसील कार्यालयाकडील सहायक महसूल अधिकारी संभाजी बंडू गाडीवड्ड यांच्या महसूल विभागाकडील उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सदर पुरस्कार त्यांना महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचेकडून महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार,महसूल उप जिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी ,निवासी उप जिल्हाधिकारी गजानन गुरव, जी.प.सी.इ.ओ.डॉ.जस्मिन, जिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण व मान्यवर उपस्थित होते.श्री.गाडीवड्ड यांचे महसूल विभागातील योगदान मोठे असून महसूली वर्षात उत्कृष्ट अशी कामगिरी बजावून जनतेला तत्पर अशी सेवा देऊन महसूल विभागाची प्रतिमा उंचावली आहे.त्यांनी आतापर्यंत 25 वर्षे इतकी विविध पदावरून सेवा बजावली आहे.पुरस्कार प्राप्त झालेने त्यांचेवर गावासह,महसूल विभागातून कौतुकाचा वर्षाव होतं आहे.




Post a Comment

0 Comments