चंदगड : देवरवाडी ता. चंदगड येथे 'प्रज्ञावंत को ऑप क्रेडिट सोसायटी लि. देवरवाडी या पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या उत्साहात व उत्सवी वातावरणात संपन्न झाला.
'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेल्या या पतसंस्थेचा मुख्य उद्देश सभासदांमध्ये बचतीची सवय निर्माण करणे, आर्थिक शिस्त वाढविणे तसेच गरजू सभासदांना योग्य व सुलभ पद्धतीने कर्जसुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.या शुभप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक माजी विस्तार अधिकारी आयु. मारूती बाळू कामत हे होते.संस्थेचे उद्घाटन डॉल्फीन कंपनीचे मालक आर. के बालासो, कृषि संपदा कृषी सेवा केंद्राचे मालक विजय वाकोबा कोकितकर, संस्थेचे चेअरमन आयु. वैजनाथ लक्ष्मण कांबळे, संस्थेचे संस्थापक आयु. संघर्ष मष्णु प्रज्ञावंत,विनायक प्रधान (चेअरमन, शिक्षक पतसंस्था चंदगड), विजय वि. कांबळे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष,प्रवीण पाटील गव्हर्न्मेंट काँट्रॅक्टर ,वसंत हरिभाऊ निट्टूरकर उद्योजक व संचालक रवळनाथ पतसंस्था कारवे,वैजनाथ लक्ष्मण भोगण ( एस डी एम सी अध्यक्ष प्रा.शाळा देवरवाडी,मल्लनगौडा रुद्राप्पा पाटील, निवृत्त सैनिक देवरवाडी , सुमित सुरेश गायकवाड (युवा उद्योजक हलकर्णी), दत्ता पाटील ओमकार ट्रेडर्स शिनोळी, डॉ मनोज तरळे , कॅप्टन तुकाराम कांबळे, संस्थेचे व्हा. चेअरमन आयु. एकनाथ मष्णू कांबळे, व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा देत प्रज्ञावंत को. ऑप क्रेडिट योसायटी ही सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी, सामाजिक विकासासाठी आणि स्वावलंबनासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला.संस्थेच्या माध्यमातून बचत खाते, मुदत ठेव, विविध प्रकारच्या कर्जसुविधा तसेच सभासदांच्या गरजेनुसार आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस संचालक मंडळाने व्यक्त केला.कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन आयु. वैजनाथ लक्ष्मण कांबळे, व्हा. चेअरमन आयु. एकनाथ मष्णू कांबळे, संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, प्रज्ञावंत बहुउद्देशीय सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी, देवरवाडी गावातील सर्व तरुण मंडळे व सर्व सभासादानी विशेष परिश्रम घेतलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश नाग तर आभार कॅप्टन तुकाराम कांबळे यांनी मानले.


Post a Comment
0 Comments