रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : काजू महोत्सवाच्या माध्यमातून चंदगड तालुका, सीमा भाग व जिल्ह्यातील उद्योगवाढीसाठी चालना मिळणारा असून या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन चंदगड तालुका काजू असोसिएशनचे अध्यक्ष शामराव बेनके व जिल्हा ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहन परब यांनी सांगितले. हा महोत्सव उद्या दिनांक 25 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत शिनोळी एमआयडीसीतील डॉल्फिन अँड डॉल्फिन या उद्योगसमूहात भरणार आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार शिवाजीराव पाटील असणार आहेत.
सदर कार्यक्रमासाठी भरमुअण्णा पाटील, माजी आमदार राजेश पाटील, नंदाताई बाभुळकर, गोपाळराव पाटील, राजेंद्र गड्यानावर,सुरेश बोलेकर, धनंजय यादव, अण्णा दुराई हे प्रमुख मंडळी उपस्थित राहणार आहेत. अपेडा चेअरमन अभिषेक देव व डॉक्टर परशराम पाटील यांचे काजू निर्यातीतील संधी व मार्गदर्शन, अनुदान व योजना विषयी माहिती विनायक कोकरे हे देणार असून या मेळाव्यात अत्याधुनिक मशनरीची माहिती देणार असल्याचे असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments