रुपेश मऱ्यापगोळ /चंदगड प्रतिनिधी : नागरिक रहिवासी चंदगड तालुका पुणे यांच्यावतीने सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी 25 रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत हळदी कुंकू समारंभ,सभासद परिचय मेळावा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम दामिनी मंगल कार्यालय,कोंढवे धावडे पूणे येथे होणार असून चंदगड तालुक्यातील पुणेस्थीत सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रहिवासी संघाचे अध्यक्ष मारुती शिट्याळकर, उपाध्यक्ष मारुती पाटील,सचिव विजय भाऊ गावडे,खजिनदार राजू गोरल,कार्याध्यक्ष सुरेश नेसरकर यांच्यासह कार्यकारी मंडळींनी केले आहे.
Post a Comment
0 Comments