पुंडलिक सुतार/नेसरी प्रतिनिधी : कोळींद्रे तालुका आजरा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आण्णा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अमोल महापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप माजी सरपंच लक्ष्मण परिट व मान्यवर यांच्याहस्ते झाले.
आजरा तालुका अध्यक्ष शरद लोखंडे यांनी उपस्थित मान्यवर यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.यावेळी बोलताना माजी सरपंच परिट म्हणाले की,श्री.महापुरे सरांनी राबविलेला हा स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. प्रभारी मुख्याध्यापक अरुण गोंधळी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन शशिकांत कुंभार यांनी केले.आभार संतराम कुराडे यांनी मामानले.यावेळ आपु पंकज सातवणेकर,मधू परिट,तानाजी बुगडे,पत्रकार पुंडलिक सुतार,अंकिता पाटील,मंगेश भोगले,ग्रा. पं.सदस्य भिकाजी गोंधळी,पांडुरंग माणगावकर,अर्जुन कोकितकर, प्रकाश सोनार व इतर मान्यवर व सर्व विद्यार्थी हजर होते.
Post a Comment
0 Comments