(15 हजार पेक्षा जास्त भाविकांनी घेतला दर्शना बरोबर महाप्रसादाचा लाभ)
चंदगड प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील रामपूर बागिलगे धुमडेवाडी नरेवाडी गुडेवाडी मजरे जट्टेवाडी व मौजे जट्टेवाडी या गावाचे आराध्य स्थान असलेल्या नूतन महालक्ष्मी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना धार्मिक कार्यक्रम सोहळा मंगलमय वातावरणात रामपूर येथे संपन्न झाला.
आजरा तालुक्यातील शिरसंगी येथून या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढत नरेवाडी गुडेवाडी मजरे व मौजे जट्टेडेवाडी धुमडेवाडी तांबुळवाडी बागिलगे या गावांमधून लक्ष्मी मातेच्या जयजयकाराचा जयघोष करत मंगलमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली . धनगरी वाद्य या महोत्सवात आकर्षक ठरले.यावेळी प्रत्येक गावामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी श्री महालक्ष्मी मूर्ती प्रतीस्थापना व पुर्णाहूती सकाळी ८ ते ११ वेळेत स्वामीजींचे स्वागत, पाद्यपुजन व आर्शीवचन नंतर प. पु. प. भ्र. सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी उ.खानापूर यांच्या शुभहस्ते श्री.महालक्ष्मी मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा महाआरती, महागाराणा, महाप्रसाद व ओटी भरणे कार्यक्रम पार पडला.
यानंतर सायंकाळी दिपोत्सव व .प्रवचन ह.भ.प. श्री. विश्वनाथ पाटील महाराज पार पडणार आहे. यावेळी होमहवन वसंत अनंत सुतार यांच्याहस्ते पार पाडण्यात आला.गेले चार दिवस रामपूर पंचक्रोशीतील या सात गावांमध्ये मंगलमय वातावरण सोहळ्याने सर्व माहेरवासिनी या लक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी आज दिवसभर रामपूर मध्ये दाखल झाल्या होत्या. भक्ती भावाने अनेकाने सोन्या आणि चांदीचे दागिने आज लक्ष्मी मातेला अर्पण केले .सुमारे 15 हजार पेक्षा जास्त भाविकांनी आजच्या या महाप्रसादाचा लाभ घेतला. अतिशय नेटक्या व सुंदर नियोजन रामपूर ग्रामस्थांनी केले होते. त्याला इतर गावातील ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देऊन हा मंगलमय सोहळा पार पडण्यास सहकार्य केल्याबद्दल ग्रामपंचायत रामपूर व ग्रामस्थ यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
Post a Comment
0 Comments