कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन !
चंदगड/प्रतिनिधी : मांडेदुर्ग व सुंडी भागात अवैद्य दोन क्रशर मशीन सुरू झालेल्या आहेत.त्या क्रशर मशीनला गावातून गावसभेला विरोध झालेला होता.तसे निवेदन तहसील कार्यालयाला दिलेले होते.तरी गावाचा विचारात न घेता अवैधरित्या जोरात क्रशर(खडी मशीन) राजरोस सुरू आहेत.जवळ-जवळ 20-25 फुटांचे मोठे ब्लास्टिंग उडवणे सुरू आहे.त्यामुळे गावातील घरांना-इमारतीना धोका निर्माण झाला आहे.तसेच 50 टनांच्या माल वाहतूक गाड्या रात्र-दिवस गावातून सुरू आहेत.त्यामुळे गावात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.श्वसनाचे व दम्याचे आजारामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. रस्त्यालगत शाळा असल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांवर कर्कश आवाजाचा व धुळीचा आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच गावातील 200 बायोगॅस लिकेज झाल्याचा दावा ग्रामस्थांकडून केला जात आहे.क्रशर मधून निघणाऱ्या धुळीमुळे भात,नाचणी तसेच काजू व जनावरांचा लागणारा चारा यावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
याविरोधात काही ग्रामस्थांनी गाड्या अडवल्यावर क्रशर मशीन मालकांकडून धमकी दिली जात आहे.एकंदरीत सर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन अवैध क्रशर कायम स्वरूपी बंद करून गावकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे व सदर प्रकरणात क्रशर मशीन मालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे.यावेळी सरपंच विनायक कांबळे,उपसरपंच गणपती पवार,सुनील पाटील,बी, एम,पाटील सर,भरमाना नवकुडकर,जिवन कांबळे,फकिरा शिंदे,पुंडलिक पाटील,मारूती याल्लारीचे,चंद्रकांत गावडे उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments