(दि न्यू इंग्लिश स्कूल,चंदगड च्या शिरपेचात मानाचा तुरा)
चंदगड प्रतिनिधी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र, पुणे आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २० २४ - २०२५ अंतर्गत राज्यातील माध्यमिक शिक्षक गटातील १५५ स्पर्धकांमधून १० उपक्रमांची निवड करण्यात आली आली.त्यामध्ये संजय साबळे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.
दि.न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडचे उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांनी *जादा तास आनंदाचा,नवे काही शिकण्याचा* या नवोपक्रमाचे राज्य स्तरावर सादरीकरण केले होते.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आहे.
या उपक्रमासाठी त्यांना डायटचे प्राचार्य डॉ राजेंद्र भोई,अधिव्याख्याता डॉ.अंजली रसाळ,डॉ.सुरेखा कुदळे प्राचार्य एन. डी .देवळे यांचे मार्गदर्शन लाभले.श्री.साबळे यांच्या या यशाबद्दल दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील जुनिअर कॉलेज, चंदगडमधील सर्व सेवकांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.संजय साबळे यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात असून, त्यांचा नवोपक्रम शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी ठरला आहे.
Post a Comment
0 Comments