चंदगड/प्रतिनिधी : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक उपविभागीय कार्यालय गडहिंग्लज येथे पार पडली.यामध्ये चंदगड तालुक्यातून प्रतिनिधी म्हणून संघर्ष प्रज्ञावंत यांना कायम निमंत्रक सदस्य म्हणून समितीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.तर महिलांचे प्रश्न सोडविण्याकरीता समितीमध्ये महिला सदस्यांची नियुक्ती करणेची चर्चा करणेत आली.यामध्ये पुनम बापूसाहेब म्हेत्री, रा.गडहिंग्लज यांना कायम निमंत्रक सदस्य म्हणून घेण्याचे ठरविण्यात आले.
या समितीच्या वतीने कायद्याची जाणीव जागृती, प्रसार व प्रचार करण्यासाठी वर्षातून चार वेळा तालुकास्तरावर कायद्याचे ज्ञान असणान्या विधीज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, संस्था-संघटनांचे प्रतिनिधी व इतर व्यक्तींना एकत्रिक करून कार्यशाळा आयोजित करणेबाबत निर्णय घेण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, सदस्य सचिव तथा गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, गडहिंग्लज तहसिलदार ऋषिकेत शेळके, चंदगडचे गटविकास अधिकारी, बाळासाहेब भोगे, गडहिंग्लज पोलिस निरीक्षक अनय सिंदकर, पोलिस उपनिरीक्षक रामदास इंगवले, सदस्य संग्राम सावंत, दिगंबर विटेकरी, प्रकाश कांबळे, वामन बिलावर आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments