बेळगाव प्रतिनिधी : बेळगाव येथील आबा हिंद स्पोर्ट्स क्लब क्रीडा भारती तर्फे भरवण्यात आलेल्या आंतरराज्य स्विमिंग चॅम्पियनशिप मध्ये भगतसिंग भारत गावडे याने विविध प्रकारात चार गोल्ड आणि तीन सिल्व्हर पदके मिळवली.50 मीटर बटरफ्लाय गोल्ड मेडल,100 मीटर फ्रीस्टाईलमध्ये गोल्ड मेडल,50 मीटर बॅकस्टोक गोल्ड मेडल,100 मीटर IM गोल्ड मेडल,50 मीटर फ्रीस्टाईलमध्ये सिल्वर मेडल, रिलेमध्ये दोन सिल्वर मेडल मिळवले.त्याला प्रमाणपत्र,मेडल, तसेच वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळाली त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भगतसिंग यांने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये तब्बल 40 हुन अधिक सुवर्ण पदके मिळवली आहेत.सध्या तो बेळगाव येथील 'के.एल.ई. स्विंमर्स क्लब बेळगांव'मध्ये प्रशिक्षण घेत आहे.याकामी त्याला अजिंक्य मेंडके,अजित जेंटीकट्टी,राजेश शिंदे,अतुल धुडूम,श्री.इम्रान,श्री.गोर्धन,सतीश यादव यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच त्याला के.एल.ई इंटरनॅशनल स्कूल स्विमिंग पूल कुवेंपूनगर बेळगाव स्टाफ यांचे सहकार्य लाभले.रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक परशुराम काकतकर,प्रभाकर कोरे(अध्यक्ष के.एल.ई सोसायटी) आणि उमेश कलघटगी यांनी पाठिंबा देत प्रोत्साहन दिले.सध्या तो मराठी विद्या निकेतन बेळगांव येथे इयता चौथी मध्ये शिक्षण घेत आहे.
Post a Comment
0 Comments