Type Here to Get Search Results !

७ ते १० फेब्रुवारी पर्यत श्री.चंद्रसेन मंदिराचा जीर्णोद्धार,वास्तुशांती व कलशारोहण सोहळा.

रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : चंदगड शहरातील स्वयंभू श्री.चंद्रसेन मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा,वास्तुशांती व कलशारोहण सोहळा शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी ते सोमवार दिनांक १०  फेब्रुवारी पर्यंत आयोजित केला आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजले पासून मुहूर्तमेढ स्थापन, ग्रामदेवतादी देवतांना आमंत्रण, प्रायश्चित विधी, शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून कळस घागरी मिरवणूक, पुण्याहवाचन शांती होम जलाधिवास पीठ देवता स्थापन, धान्यवास, हा सोहळा पुरोहित वेदमूर्ती सुनील सोमन व इतर ब्रह्म वृंद सहकार्य यांच्या वेदमंत्र घोषामध्ये करण्यात येणार आहे. 

रविवारी सकाळी ९  पासून प्रकार शुद्धी वास्तु यज्ञ होम विधी, सायंकाळी ७:०० वाजता मराठी भक्ती गीताचा कार्यक्रम , सोमवारी सकाळी प्रकाश शुद्धी महा अभिषेक, कलशारोहण बलिदान पूर्णहुती,आरती गाराने, महाप्रसाद व सांगता. सकाळी दहा वाजता मठाधिपती श्री. ब. ब्र. श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी श्री सुरगेश्वर संस्थान मठ कसबा नुल यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजले पासून महाप्रसाद आयोजित केले असून संध्याकाळी सात वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी या कलशारोहण सोहळ्याचा पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रसेन गणेशोत्सव मंडळ मार्फत करण्यात आले आहे.





Post a Comment

0 Comments