नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : मलीग्रे हायस्कूल येथे कुष्ठरोग जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान १३ फेब्रुवारी पर्यंत पार पडणार आहे. या अभियानात विविध स्पर्धा पार पडणार असून रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोग जनजागृती विषयी नाटिका , महिला बचत गट , नेहरू युवा मंडळ , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फलकावर आयईसी लावणे,अशा सूचना मलिग्रेअंतर्गत आठ उपकेंद्रांना देण्यात आल्या आहेत.
समाजामध्ये कुष्ठ रोगाविषयी जनजागृती करून हा कार्यक्रम शाळेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी घरापर्यंत कसा पोहचेल हा उद्देश ठेवत जनजागुती करण्यात येत आहे.'कुष्ठरुग्णांची सेवा हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न' याविषयी माहिती देताना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर के.के.काझी यांनी मत मांडले.
30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 25 पर्यंत संपूर्ण ,मलिग्रे प्राथमिक आरोग्य केंद्राची २२४४४ तपासणी करण्यात येणार असल्याचे व संशयित रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रास तपासणीसाठी पाठवावे अशी माहिती डॉक्टर के.के.काझी यांनी दिली.त्यांनतर आरोग्य सहाय्यक जे. एस.बोकडे यांनी 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंतचे कोणते कार्यक्रम घ्यायचे याविषयी मार्गदर्शन केले.तसेच श्री.पन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले. तर मिलिंद सावंत यांनी आभार मानले.यावेळी आरोग्य सेविका,आशा, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments