रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : देवरवाडी तालुका चंदगड येथील प्रज्ञावंत बहुउद्देशीय सेवा संस्थेमार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार व रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपन्न झाल्या.
समाजातील विद्यार्थी व पालकांचे मनोबल वाढवणे व समाजातील निष्पक्ष वृत्तीने व मानवतेच्या दृष्टीने काम करणाऱ्या मान्यवरांच्या कार्याला पाठबळ देऊन त्यांना गौरवीत करणे हा शुद्ध हेतू यामागे असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कांबळे यांनी स्पष्ट केले.यावेळी प.रा. पाटील गुरुजी,डॉक्टर मनोज तरळे,बसवराज पुजारी,नारायण वाइंगडे,अनुसूचित जाती जमाती अत्याचार समितीचे कायम निमंत्रित सदस्य संघर्ष मष्णू प्रज्ञावंत,डॉक्टर नागेंद्र जाधव,शिवश्री संदीप भोगण,विनायक प्रधान,निवृत्त कॅप्टन तुकाराम कांबळे,शुभांगी गावडे,संदीप जाधव,डॉक्टर निवृत्ती गुरव,चंदगड पोलीस ठाण्याचे कार्यक्षम पोलीस अधिकारी विश्वास पाटील,आर.के.बाला या मान्यवरांचे शाल,श्रीफळ,चषक व फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना हा उपक्रम प्रेरणादायी, कलागुणांना वाव देऊन येणारी पिढी कार्यक्षम बनविणारे असल्याचे मत व्यक्त केले. संस्थेचे सचिव वैजनाथ कांबळे सरांनी सूत्रसंचालन तर प्रकाश नाग यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकनाथ कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभार संस्थेचे खजिदर देवेंद्र कांबळे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments