Type Here to Get Search Results !

चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

चंदगड संघटनेचे कार्य आदर्शवत-प्रा. विक्रम पाटील

राजेंद्र शिवणगेकर/चंदगड प्रतिनिधी : चंदगड रहिवासी संघटनेतर्फे शहर उपनगरांतील सर्व चंदगडकरांना एकत्र करुन नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.अन्य संघटनांसाठी हे कार्य आदर्शवत आहे. क्रीडा, वैद्यकीय, बांधकाम, शैक्षणिक तसेच अन्य क्षेत्रांमध्ये चंदगडकरांनी कर्तबगारी दाखवून तालुक्याचे नाव मोठे केले आहे, असे मत दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांनी व्यक्त केले.


चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचा २३ वा वर्धापन दिन नुकताच रावसाहेब गोगटे रंगमंदिरात झाला. त्यावेळी ते बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष प्रा. एम. के. पाटील अध्यक्षस्थानी होते.संघटनेचे उपाध्यक्ष अशोक थोरात, सचिव पी. सी. पाटील, विवेकानंद पाटील, प्रा. विक्रम पाटील, प्रा. एम. के. पाटील व्यासपीठावर होते.गंगाराम कंग्राळकर यांनी स्वागत व परिचय करुन दिला.कर्तबगार ज्येष्ठ नागरिक म्हणून सोनाबाई पाटील, मंगल पाटील, सुरेखा शिरवळकर यांच्यासह निवृत्त प्राचार्य एम. बी. निर्मळकर, प्रा. पाटील, डॉ. मोहन पाटील यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 

यावेळी एक्स नेव्ही असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पाटील,सोसायटीच्या व्यवस्थापिका छाया पाटील, उमाजी शिरगावकर, संजय खवनेवाडकर, अनंत पाटील, संजय वर्षे, राहुल पाटील, रोहित पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. डी. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.उपाध्यक्ष थोरात यांनी आभार मानले. यानंतर महिला मंडळातर्फे झालेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.





Post a Comment

0 Comments