चंदगड प्रतिनिधी : सध्याच्या युगात सैराचार मजला असून आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात माणसाबद्दल आदर प्रेम निर्माण होण्यासाठी आज खऱ्या अर्थाने भक्तीचा मार्ग स्वीकारला तर त्यातून माणुसकीचे खरे दर्शन घडेल.यासाठी अध्यात्मिक संगतीतून जीवनाची संगत निश्चित सुधारू शकेल असे मत संगीत मार्गदर्शक ह.भ.प विजय मटकर यांनी व्यक्त केले.चंदगड तालुक्यातील मजरे कार्वे येथे स्वराज मल्टीपर्पज हॉल येथे विठू माऊली संगीत कला मंच मजरे कारवे आयोजित केलेल्या विद्यार्थी हरिपाठ सोहळा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
चंदगड तालुका बेळगाव खानापूर सीमा भागातील विद्यार्थ्यांना अध्यात्माची गोडी लागण्यासाठी आयोजित केलेल्या या हरिपाठ सोहळ्याच्या सुरुवातीला निवृत्ती हरकारे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. उपस्थितांचे स्वागत मारुती पाटील त्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मार्गदर्शक ह भ प विजय मटकर म्हणाले,विद्यार्थी जीवनात जर अध्यात्माची जोड मिळाली तर उद्याचा भावी आदर्श नागरिक घडण्यास मदत होईल.समाजामधील एकमेकाबद्दल द्वेष भावना दूर करण्यासाठी अध्यात्मातील विचारांचे बालमनावर संस्कार झाले तर मानवी जीवन भविष्यात सुखकर होण्यासाठी व विद्यार्थ्याचे आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आज सुसंस्कारांची रुजवन गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.तर गुरुवर्य ह भ प पुंडलिक कलखामकर यांनी संयोजकांनी आयोजित केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून अध्यात्माने मानवी जीवनाला एक वेगळी दिशा दिली असून मानवी जीवन सुखकर करण्याचा हा मार्ग निश्चितच योग्य असून बालमनावर त्याचा निश्चित परिणाम होतो असे मत यावेळी व्यक्त केले.
या सोहळ्यामध्ये शिवदुर्गा हरिपाठ महिला मंडळ कारवे , शिवकला भजनी मंडळ कारवे, नागुर्डे वाडा भजनी मंडळ खानापूर, महिला भजनी मंडळ कलीवडे, हरिपाठ महिला मंडळ बेलेभाट , कौलगे, किनये खानापूर ई मंडळांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक चंद्रकांत पोतदार यांनी केले तर आभार राजेंद्र बोकडे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments