Type Here to Get Search Results !

गोठ्यात नवजात अर्भक सापडल्याने सर्वत्र खळबळ.

गडहिंग्लज प्रतिनिधी/कविता मऱ्यापगोळ : हलकर्णी तालुका गडहिंग्लज येथे पानारी गल्लीतील शेळी बांधण्यात येणाऱ्या गोठ्यात अडगळीतील बोळामध्ये स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने गावात मोठी खळबळ उडाली.याबाबतचे अधिक माहिती अशी की,हलकर्णी येथील पानारी गल्लीत रामगोंडा नावलगी यांच्या शेड लगत असणाऱ्या बोळात बाळाचा रडण्याचा आवाज  नावलगी यांच्या पत्नीला आला. त्यांनी तिथे जाऊन पाहिले असता प्लास्टिक कॅरीबॅग मध्ये स्त्री जातीच्या अर्भक  गुंडाळलेल्या स्थितीत आढळून आले.ही माहिती त्यांनी आजूबाजूला असणाऱ्या महिलांना दिली. त्यावेळी इतर महिलांनी बाळाला गरम पाण्याचे अंघोळ घालून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द केले.


गोंडस व निरागस बालकाला पाहून उपस्थितांची मने हेलावली.निष्पाप अर्भकाला उघड्यावर टाकून जाणाऱ्या व्यक्तीबद्दल ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.ही माहिती पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर गडहिंग्लज  पोलीस ठाण्याचे  पोलीस  निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.याबाबतची फिर्याद रामगोंडा नावलगी यांनी दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पल्लवी पवार करत आहेत.





Post a Comment

0 Comments