(नागनवाडी - विंझणे मार्गावर मोठी कारवाई)
रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : राज्य शासनाचा कर चुकविण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीची दारू अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चंदगड पोलिसांना गोपनीय माहितीनुसार गोवा राज्यातून बेळगाव कडे चार चाकी वाहनातून दारू येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर चंदगड पोलिसांनी कानूर येथे सापळा रचला.रात्री साडेबाराच्या सुमारास गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता इनोव्हा कार वेगाने कानूर खुर्द,नागनवाडी मार्गे अडकुर,विंझणे गावाकडे नेण्याचा प्रयत्न चालवला.यावेळी पोलीस पथकाने पोलीस वाहनातून त्याचा पाठलाग केला.यावेळी अज्ञात चालकाने विंझणे हद्दीत अंधाराचा फायदा घेत वाहन सोडून पलायन केले.
पोलिसांनी या कारची तपासणी केला असता मागील बाजूस वेगवेगळ्या कंपनीच्या गोवा बनावटीची 5 लाख 12 हजार 400 रुपयांची सीलबंद दारूच्या बाटल्या सापडल्या.यावेळी पोलिसांनी कारसह 14 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सापडलेल्या कारचा मालक व अज्ञात चालक त्यांचा शोध घेण्यासाठी चंदगड पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले असून ते पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.
अज्ञात आरोपीवर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा व मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितल धविले या करत आहेत.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, हवालदार सुनील माळी, तुकाराम राजगिरे, नितीन पाटील, आशुतोष शिवुडकर, ईश्वर नावलगी या पोलीस पथकाच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Post a Comment
0 Comments