मिरज प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : मिरज रेल्वे स्थानकावर लोको पायलट,ट्रेन मॅनेजर,ट्रॅकमन हे सर्वजण आपल्या मागण्यासाठी उपोषण करत असून हे आंदोलन 20 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी रात्री 8 वाजेपर्यंत राहणार आहे.
यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी, माल गाडीसाठी 8 तासापेक्षा जास्त ड्युटी नसावी,मेल एक्स्प्रेस साठी 6 तासांपेक्षा जास्त ड्युटी नसावी,महागाई भत्ता 50 टक्के झालेनंतर त्यासोबत किलो मिटर भत्ता 25 टक्केनी वाढ व्हावा.दोन रात्री पेक्षा जास्त नाईट ड्युटी असू नये,किलो मिटर भत्ता 70 टक्के आयकर मुक्त असावा,जास्तीत जास्त 36 तासांच्या आत लोको पायलट मुख्यालयात परत यावेत,ट्रॅक मन लोकांचे नाईट पेट्रोलिंग ड्युटी स्टेशन ते स्टेशन असावी किंवा 8 किलोमिटर पेक्षा जास्त नसावी.सध्या ते 20 किलोमिटर पर्यंत ड्युटी करतात त्यामुळे विदाउट गार्ड गाडी संचलन बंद असावे.ट्रॅक मन लोकांचे काम रेल्वेपूरते असावे या आदी मागण्यांसाठी सर्व कामगारांनी उपोषण सुरु ठेवले आहे.
या उपोषणाचे नेतृत्व ऑल इंडिया लोको रानिंग स्टाफ असोसिएशन,ऑल इंडिया गार्ड कौन्सिल,सेंट्रल रेल्वे ट्रॅकमन युनियन आदी करीत आहेत.उपोषण मध्ये 200 जणांचा सहभाग आहे.
Post a Comment
0 Comments