नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : वाटंगी येथील प्रथम कन्या सानिका संतोष बिरजे हीची मुंबई पोलिस पदी निवड झालेने गावासह तालुक्यातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.सानिकाचे बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण आजरा महाविद्यालय आजरा येथे झाले असून पोलीस पदासाठी तिची मैदानी चाचणी मरीन लाईन मुंबई येथे झाली.तर लेखी परीक्षा आग्री पाडा मुंबई येथे झाली.
सदर परीक्षेत तिने 150 पैकी 129 गुण प्राप्त करून घवघवीत यश मिळविले.यासाठी तिला वडील संतोष,आई सौ.सुरेखा,भाऊ साहिल,बहीण सौ.ज्योती युवराज जाधव यांचे प्रोत्साहन लाभले.
Post a Comment
0 Comments