Type Here to Get Search Results !

सामान्यज्ञान स्पर्धा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रेरणादायी- तहसीलदार राजेश चव्हाण

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील) व मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानकुंभ शैक्षणिक व्यासपीठ आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा ही व्ही.के.चव्हाण पाटील महाविद्यालय येथे उत्साहात संपन्न झाली.यावेळी 895 बालमित्रांनी स्पर्धेत उत्साही सहभाग घेतला.कै.शिवाजीराव पाटील (माजी आमदार)यांच्या प्रतिमेचे पूजन तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी संतान लोबो,भ र पाटील,महादेव नाईक याचबरोबर शिक्षक संघाचे अध्यक्ष  शिवाजी पाटील व त्यांची सर्व कार्यकारणी,पदवीधर सभेचे अध्यक्ष अशोक नौकुडकर व सर्व कार्यकारणी ,श्री देव वैजनाथ पतसंस्था चेअरमन विलास पाटील, व्हा.चेअरमन अर्जुन चाळूचे व त्यांची सर्व कार्यकारिणी, विष्णू पाटील पतसंस्था अध्यक्ष बाळकृष्ण मुतकेकर व त्यांची सर्व कार्यकारिणी,पारगड शिक्षक संस्थेचे माजी चेअरमन डी. बी.पाटील व संचालक,डीसीपीएस संघटनेचे सरचिटणीस  बाळाराम नाईक , नेते.संजय गावडे व त्यांची कार्यकारणी, शिक्षक संघ महिला आघाडी अध्यक्ष प्रमिला कुंभार व त्यांची कार्यकारणी,विमुक्त शिक्षक संघ अध्यक्ष  तानाजी नाईक व कार्यकारिणी यांच्या उपस्थितीत परीक्षा यशस्वीपणे पार पाडली. 

बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरावरील यशस्वी शाळा वि.म. बिजूर, वि.म केरवडे, वि.म. बसरगे, वि म शिनोळी बुद्रुक, वि.म.सुंडी,वी. म .सरोळी या शाळांचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी यांचा सन्मान तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याहस्ते   करण्यात आला.मौजे कारवे शाळेची विद्यार्थिनी श्रेया लक्ष्मण पाटील ही राष्ट्रीय वीर गाथा पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल तिचा व मार्गदर्शक शिक्षक यांचा माननीय तहसीलदार यांचेहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. 

या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विष्णू गावडे,प्राचार्य उत्तम पाटील( व्ही के.चव्हाण महाविद्यालय) व संघटनेचे पदाधिकारी यांचे शुभहस्ते ज्ञानकुंभ शैक्षणिक व्यासपीठाच्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. एक ते चौथी या गटात कू.पियुष पाटील तर पाचवी ते सातवी या गटात कू.स्वराज्य भीकले यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. यावेळी ज्ञानकुंभ शैक्षणिक व्यासपीठाच्या नूतन कार्यकारणी अध्यक्ष संजय घोळसे,सचिव आप्पाजी रेडेकर,कार्याध्यक्ष दिग्विजय फडके सर,कोषाध्यक्ष रणजीत कांबळे ,उपाध्यक्ष श्री संजय हजगुळकर,उपाध्यक्ष सुहास रेडेकर,प्रवक्ते श्री राजाराम पाटील, सहचिटणीस  योगेश पाटील यांचेसह सर्व कार्यकारिणीचा सत्कार तहसीलदार यांच्याहस्ते करण्यात आला.

या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिला कुंभार यांनी केले.तर अध्यक्षिय भाषण व उपस्थित पाहुण्याचे आभार शिवाजी पाटील सर यांनी मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी चंदगड तालुक्यातील विद्यार्थी पालक मार्गदर्शक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments