(जीवितहानी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून 25 लाख रुपयांची मदत मिळावी-बहुजन मुक्ती पार्टी)
रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : चंदगड तालुका हा डोंगराळ व जंगल भागात असल्याने येथे वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून या प्राण्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा तसेच जीवित हानी झाली तर शासनाकडून 25 लाख रुपयांची मदत मिळावी अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी चंदगड युनिटच्या वतीने निवेदन वनविभागाला देण्यात आले.
हेरे,कलिवडे व जंगम हट्टी येथे दिवसाढवळ्या हत्ती कित्येक दिवस फिरत होता. दुंडगे येथे गव्याच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला ही घटना अत्यंत दुःखदायी असून शासनाकडून जी मदत मिळते ती वाढवून मिळवावी. इन्कम रिस्क मॅनेजमेंट ऍक्ट हा कायदा भारताबाहेरील देशांमध्ये लागू आहे.तसाच कायदा भारतामध्ये देखील लागू करावा व त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रकाश नाग, गजानन तळवार, श्रीकांत कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments