रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : आज,रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 24 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अझरुद्दीन नाईक ( वय - 39 वर्षे रा. आझाद गल्ली चंदगड ) हे आपले मित्र गौस मदार रा. चंदगड यांच्यासोबत फुले आणण्यासाठी बेळगाव येथे दुचाकीवरून जात असताना मजरे कार्वे येथे आले असता त्यांच्यासमोरून बेळगाव कडे जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून पुढे जात असताना ट्रॉल्या डचमळून पुढील ट्रॉलीचा त्यांना धक्का लागल्यामुळे पाठीमागील ट्रॉलीच्या उजव्या चाकाखाली सापडल्या मुळे ट्रॉलीचे चाक त्यांच्या पोटावर व छातीवर गेल्याने ते गंभीर जखमी होऊन मयत झाले. व गौस मदार हे गंभीर जखमी झाले.
या अपघातातील ट्रॅक्टर ( kA -22 T 7428) चालक श्रीधर भैरू पाटील राहणार ढेकोळेवाडी ता.चंदगड जि.कोल्हापूर याच्याविरुद्ध परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वेगाने,अविचारणे चालवने व अपघाताची वर्दी न देता पळून गेल्याने त्याच्या विरोधात मयत अझरुद्दीन नाईक यांचे चुलत भाऊ सिकंदर नाईक ( रा. चंदगड ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील करत आहेत.
Post a Comment
0 Comments