Type Here to Get Search Results !

सीमा समन्वयक मंत्र्याची नियुक्ती व्हावी-महाराष्ट्र एकीकरण समिती

रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : महाराष्ट्र एकीकरण समितीचे सीमा भाग वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर व मध्यवर्ती समितीचे सक्रिय कार्यकर्ते श्री विकास कलघटगी यांनी ठाणे येथे आनंदाश्रम मध्ये  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटून कोल्हापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जे निवेदन दिले होते त्याची एक प्रत शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. 

या भेटीत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करत असताना लवकरात लवकर सीमा समन्वयक मंत्र्याची नियुक्ती व्हावी व ही नियुक्ती बेळगाव तसेच सीमा भागातील लगत असणाऱ्या मंत्रिमंडळातील व्यक्तींची नियुक्ती व्हावी अशी विनंती करण्यात आली होती. हीच मागणी नागपूर येथे रमाकांत कोंडुसकर व रणजीत चव्हाण पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती. त्या मागणीचा विचार करत सरकारी स्व सहाय्यक यांना त्वरित शेरा लिहून प्रस्ताव पुढे पाठवण्यास सांगितले आणि त्या पत्रावरती कोल्हापूर जिल्ह्याचे पालक व आरोग्य मंत्री श्री प्रकाश आबिटकर, चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, साताऱ्याचे पालक व खनिज मंत्री शंभूराजे देसाई या तिघांच्या नावाचा प्रस्ताव सचिवालयाला  पाठवला असून या विषयी लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहे.





Post a Comment

0 Comments